ॐ नमः शिवाय-श्री गणेशाय नम
।।शिव महिम्न स्तोत्रम्।।
नमुनी
गणेशाते महिन्म स्तोत्र म्हणावे
मूळ जे
पुष्पदंते संस्कृतात रचिले
मराठीकरण
त्याचे नारायणाने केले
सुमधुर चालीत
जे कल्याणीने बांधिले.
१. ऋषीजन गुणीजन ज्ञानी मुनी गंधर्व
थकले स्तुती करून किन्नर ब्रम्हदेव
तयांपुढे काय पाड माझा मी एक मूढ
तरीही मी आळवीन दयाळू चंद्रचुड.
२. वेदही वर्णू शकेना निर्गुण रूप तुझे
मानवी मन वाचेचा काय प्रभाव तेथे
सगुण स्वरूप परी सर्व जनां आवडे
कराया गुणगान त्याचे कोणा नावडे.
३. निर्मिली तू देववाणी गोड अमृताहुनी
योजुनी ती करी स्तुती सुरगुरु वृहस्पती
जाने तो परी त्या कामी अपुरी त्याची शक्ती
तरीही मी अल्पमती गाईन तुझी महती.
४. त्रिगुणरहित दिव्य जरी ऐश्वर्य तुझे
सगुण रुप भव्य धरी तू त्रीदेवांचे
घडवी वाढवी मोडी त्यांच्या हस्ते विश्व हे
व्यर्थ परी वाद घाली गूढ हे जो न जाणे.
५. धरुनी आस मनात काय कोणते शरीर
उपाय करीसी काय काय घेऊनी आधार
निर्मिण्या विश्व तू हे धरी कोणते औजार
आसंख्य या प्रश्नांचे कोणा माहित उत्तर
आतर्क्य तव ऐश्वर्य ओळखे कोण तो नर
जाणतो आम्ही हे सर्व म्हणती ते निरक्षर .
६. कायाधारी मर्त्य प्राणी अजन्मा असतील का
निर्मिण्या हे विश्व कोणी अमर्त्य शक्ती नको का
कारण काय साधन कळेना याचे नास्तिका
मूळ तुची या विश्वाचे असशी वरदायका.
७. वैष्णव शैव सांख्य योग इत्यादी पंथ
म्हणती तुच परम तत्व वेदादी ग्रंथ
विविध मार्ग जरी असे एकची लक्ष्य
धावे पडो कोठेही सागराकडेची जल.
८. नरकरोटी परशु गिरीशा नाग नंदी
खट्वाङ्ग चार्म भस्म
तुझी इतुकी शिबंदी
कृपाकटाशे परी तू
देसी देवांही समृद्धी
भुले न इह भोगा
मग्न जो आत्मानंदी.
९. अस्थिर जग हे म्हणे कोणी म्हणे ते स्थिर
मानीती कोणी शनैक कोणी मात्र अमर
ऐकूनी हे मूढमती मी मतमतांतर
तरीही करीन स्तुती तुझी तू भाव हर.
१०. रूपाच्या तव तेजाचा अग्निमय शोध घेण्या
गेले श्री विष्णू ब्रह्मा दिशेने खाली वरच्या
करीती यत्न अति सांबा तव थांग घेण्या
मिळेना पार म्हणुनी लागले तुला स्तवया
भक्तीने मग स्वरूप दाविले तू स्वये त्यां
केली जर तुझी सेवा जाईल कशी वाया.
११. महिमा तव भक्तीचा असे विख्यात आननी
दशानने शिरमाळा आर्पिता तव चरणी
मिळे सहज निर्वैरी राज्य त्या त्रिभुवनी
सज्ज युद्धा परी सदा स्वबाहू तो उभारुनी .
१२. खल जसा होई उन्मत मान मिळता
रावण जो बलवान झाला कृपा तुझी होता
बळकावू तोची पाहे तव कैलासवनाला
दाबी शिरी पदांगुष्ठ धाडी तू
नी त्या पाताळा.
१३. ऐश्वर्य सुरवरांचे फिके पडे ज्याफुडे
त्रिभुवन जिंकणाऱ्या वैभव बाणासुराचे
असे ते परी तो देई सेवकांना दान ते
नवल त्यात नाही भक्त तव तो हे जाणे
सेवकांना तुझ्या कामी कधीतरी का भासे
कशाचीही त्रिपुरारी नम्र तुझ्या चरणी जे.
१४. भयभीत सुरासुर क्षय ब्रह्मांड पावता
करण्या कृपा त्यांवर प्राशी विष तू महेशा
त्यामुळे जरी झाला गळा तुझा निळाकाळा
व्यसन जनहिताचे ज्या शोभे डागही त्या.
१५. दानव देव मानव कोणीही असो लक्ष्य
शर ज्या मदनाचे होती कधी ना विफल
इतारांसम तुलाही करू पाहता वश
नामशेष होई तो नी त्याचा जीतेन्द्रियापाश.
१६. तांडव तव अधभूत तरीण्या विश्व करीसी
विपरीत जरी भासे नृत्य ते परिणामी
थरथरे पदाघाते पडघमासम पृथ्वी
हातवारे हतगती हलविती तारे व्योमी
जटाताडनाने तव डळमळे स्वर्गही
समजेल कशी आज्ञा दैवी किमया तुझी.
१७. अजस्त्र तारांगण आकाशगंगा प्रवाही
चमके भाळी फेसाळे दिसे बिंदुसम परी
किवा भासे द्वीपासम सागर वेस्ठीत मही
अगम्य तव रुपाची अशी ही कल्पना थोडी.
१८. त्रिपुरवधासाठी केली प्रचंड तयारी
ऊर्वीचा केला रथ खग सोम चाके ज्याची
झाला सारथी ब्रह्मा धनु मेरू शर हरी
खाटाटोप न हा सारा लीला तव केवळ ही.
१९. कमलचरणी तव पद्म सहस्त्र घेऊन
आर्पिण्या बसे करून संकल्प नारायण
पडे जेव्हा एक कमी वाही स्वनेत्र काढुन
सार्थ करी श्रीहरी नाव राजीवलोचन
पाहून थोर ही भक्ती वर देसी सुदर्शन
धरून मग ते करी करी तो विश्वरक्षण.
२०. आराधिता अधिष्ठाता यज्ञकर्माचा पुरुष
मिळे फळ यजमान परी ते सुप्त स्थितीत
करीसी तू ते जागृत असा तू श्रुतीविख्यात
म्हणुनी करीती कर्म सार्वजन जे सश्रद्ध
२१. फळ देसी यज्ञचे आसरा शरणागता
ख्याती अशी तुझी जरी नष्ट केले दक्षयज्ञा
उपस्थित जरी तेथे ऋषी देव देवता
केले सिद्ध होई भ्रष्ट अश्रध्द यज्ञकर्ता.
२२. सुरूप अती स्वकन्या पाहता प्रजापिता
होवुनी कामातुर करी हिरनी तिला
बने मग स्वता मृग पाहे भुलवू बाळा
शिकविण्य धडा तेव्हा धामाकावूनी त्याला
धरुनी धनु तू हाती व्याधरूपे धावला
स्मरूनी शर तो कापे आजही ब्रह्मा
२३. करावी कीव किती अल्लड युवतींची
म्हणती बाईलवेडा नटेश अर्धनारी
विसरेल का श्री उमा दग्ध केला तू क्षणी
धजला मदन जेव्हा धरू ला मोहापाशी
२४. स्मशानी करीसी क्रीडा चिता भस्म तू लेपुनी
रुंडमाळा गळा जांच्या पिशाच्च संगे घेऊनी
अमंगल जरी हर भासे अज्ञास
वरुनी
सुमंगल सर्वदा तो होई भक्ता वरदायी
२५. कोंडूनी प्राणवायू चीत्ताकाशी जे योगी
डुंबुनी
आनंद डोही रोमांचित शारिरी
होऊनी
अंतर्मुख अंतर्दृस्टीने पाहती
जोतिर्मय
निराकार तत्व ते तूची असशी .
२६. तू सशी तू भास्कर धरणी तू तू गगन
तू अनल तूची आत्मा जल तू नि तू पवन
म्हणती एकची यांत तव तत्व पंडित
मात्र माझी श्रद्धा तत्व नसेची तू नसे ज्यात
२७. ऋग यजुर अथर्व त्रिवेद हे व त्रिदेव
जागृत स्वप्न सुषुप्ति मानस्थिती या तीन
अ उ म हे त्रिवर्ण तसेची हे त्रिभुवन
उरे या सर्वा व्यापून शिव ॐकार स्वरूप
२८.
भव शर्व
रुद्र उग्र भीम ईशान महेश पशुपती
अशी आठ त्वनामे
वर्णिती वेद
हरेक नामी या तव
श्रुतींचा असे संचार
तुझ्या त्या तेजरुपाला
माझा असो नमस्कार .
२९.
प्रणाम
तुला हे दूर निकटा तुला प्रणाम
प्रणाम तुला हे
सूक्ष्म विशाला तुला प्रणाम
प्रणाम तुला तू सान
वरिष्ठा तुला प्रणाम
प्रणाम मोक्षारुपासी
त्रिनेत्र शर्वा प्रणाम.
३०.
रजोगुणी
विश्वकर्मा भवा तुला हे नमन
तमोगुणी नष्टकर्ता
हरा तुला हे नमन
सत्वगुणी हितकारी
मृदा तुला हे नमन
निर्गुण तू निराकारी
शिवा तुलाही नमन.
३१.
विकल मन
हे माझे नवरे आवरीता
सकल गुण ते तुझे
वर्णावे ना वर्णिता
पाहता भक्ती माझी
दिव्या तू केली कृपा
वदविला मममुखे रम्य
ही काव्य पूजा.
३२.
मिसळूनी
कृष्णामेरू सागरी केली शाही
मोडुनी कल्पतरू सज्ज
केली लेखणी
अवनी भुइसपत
पत्रासमान केली
येकत्र अशी अफाट
सामग्री जमवली
लिहू जरी मग बसे
सर्वदा श्री सरस्वती
शके न वर्णू तीही महेशा
तव महती .
३३.
दानव
देव मुनी पूजती चंद्रमौळी
गुण त्या निर्गुणाचे
वर्णिले महाग्रंथी
वृतबद्ध भर त्यात
पुष्पदंन्ते घातली
रचुनी ही सुमधुर
काव्वमय पुष्पांजली .
३४.
पठन
पवित्र स्तोत्र केले जर हरदिनी
एकाग्र शुद्ध चित्ते
संशय यात नाही
शिवलोकी घडे वास
रुद्रासमान निश्चिती
मिळे जागी बहु धन
आयुष्य कीर्ती संतती.
३५.
शिवाशिवाय
ना देव महिन्मासम ना स्तुती
अघोरासम ना मंत्र न
श्रेष्ट तत्व गुरुहुनी.
३६.
दिक्षादान
तीर्थाटन तप याग ज्ञानार्जन
सर्व कलांहूनी पण
मोठे महिन्म पठन.
३७.
पुष्पदंत
नामे गेला गंधर्व नृप होऊन
शशीधरशंकराचा भक्त
परम निस्सीम
भ्रष्ट होता सांबकोपे करी तो शिव अर्चन
रचुनी गायी मग हे महिन्म दिव्य महान .
३८.
मिळविण्य स्वर्ग
मोक्ष देवादिकांसामान
जुळवुनी कर सोत्र केले जर हे पठन
घडेल शिव समीप नित्यवास नी श्रवण
किन्नरगानाचे हे पुष्पदंताचे वचन.
३९.
असे समाप्त हे
स्तोत्र गंधर्व जे गायिले
मनोहारी महादेव महात्म्य ज्यात वर्णिले.
४०.
काव्यापुजा स्वल्प
रुजू केली ही शिवचरणी
प्रसन्न होवो तो शंभू सार्वजन हितकारी.
४१.
तुझे तत्व न मी जाणे
महिमा रूप वा गुण
जसा ही तू तुला माझा शिवा त्रिवार वंदन.
४२.
म्हणे हे स्तोत्र जो
नर एक दोन व तीनदा
पापमुक्त करी वास शिवलोकी तो सर्वदा .
४३.
निघेल जे मुखातून
पुष्पदंताच्या मधुर
पापहर हर प्रिय महास्तोत्र मनोहर
म्हणता हे एकचित्ते पाठ करुनी सुस्वर
प्रसन्न होई सत्वर महादेव महेश्र्वर.
इती
श्री पुष्पदंत विरचित श्रीशिवमहिन्म
स्तोत्र अनुवाद समाप्त.
श्री शिवार्पणमस्तु
No comments:
Post a Comment